Saturday , March 23 2019
Breaking News Breaking News - धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या       Breaking News - अबकी बार, सोलापूर का खासदार…आंबेडकर का वारीसदार !       Breaking News - युतीच्या मनोमीलन बैठकीकडे भाजप आमदार, नगरसेवकांची पाठ       Breaking News - पार्थ पवारांच्या सभेमध्ये राष्ट्रवादीसह मनसेचे झेंडे!       Breaking News - प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची क्रेज       Breaking News - मनसेच्या लोकसभा निवडणुकीची भूमिका मांडायला राज ठाकरे यांनी ठरवली ही तारीख       Breaking News - पोटी जन्म घेतला म्हणून, वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात असं नाही : धनंजय मुंडे       Breaking News - आईबाबांचे ऐकले नाही, तर जनतेचे काय ऐकणार? अजित पवारांचा सुजय विखेंना टोला       Breaking News - भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय       Breaking News - ‘प्रकाश आंबेडकर यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करा’      
Home / ब्रेकिंग न्यूज / मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

राज्यात मराठा समाजाला 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाला असून त्याचे विधेयक आणि अधिसूचनाही काढली. मराठा आरक्षणाचा कायदा झाला असताना देखील या विरोधात काही व्यक्ती, संस्था, संघटनांकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल होऊ शकते. ही शक्‍यता लक्षात घेऊन राज्य सरकारकडून आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.

मराठा आरक्षणाला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी राज्य सरकारने रणनीती आखल्याचं दिसतंय. कॅव्हेट दाखल झाल्यामुळे मराठा आरक्षणाविरोधात कुणाचीही याचिका दाखल झाल्यास सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही. या कॅव्हेटमुळे कोणीही आरक्षणाच्या विरुद्ध न्यायालयात आव्हान दिले तर निर्णय देण्याअगोदर राज्य सरकारला कळवले जाईल व बाजू ऐकल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.

यापूर्वी मराठा आरक्षणप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केला आहे. आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाल्यास विनोद पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय उच्च न्यायालयाला निर्णय देता येणार नाही.

Check Also

पार्थ पवारांच्या सभेमध्ये राष्ट्रवादीसह मनसेचे झेंडे!

मनसेच्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थिती दिसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र मावळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *