Monday , May 20 2019
Breaking News Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर       Breaking News - मनसेच्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून धनंजय मुंडेंनी रद्द केली सभा       Breaking News - विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार       Breaking News - पुण्यातून लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा नकार       Breaking News - अजितदादांची डोकेदुखी वाढली; मावळ, शिरूरमध्ये प्रचार न करण्याचा काँग्रेसचा निर्धार       Breaking News - राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला       Breaking News - धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या       Breaking News - अबकी बार, सोलापूर का खासदार…आंबेडकर का वारीसदार !       Breaking News - युतीच्या मनोमीलन बैठकीकडे भाजप आमदार, नगरसेवकांची पाठ      
Home / ब्रेकिंग न्यूज / प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची क्रेज

प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची क्रेज

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेल पुढे ठेऊन नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर या काळात इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल २१ राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र देशात या काळात दलितांच्या सुरक्षितता व दलितांवर अन्याय अत्याचार व भिमा कोरेगाव सारखी दंगल सरकारने घडवली असा आरोप भाजपावर आहे. तर दुसरीकडे संविधान जाळण्यात आले त्यामुळे बहुजन समाज असुरक्षित असल्याचं म्हटलं जातं भाजपा सरकार आर एस एस चालवत आहे.

त्यामुळे आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून खेचण्यासाठी देशात सर्वाधिक सत्ता काबीज करणाऱ्या काँग्रेसने आगामी निवडणूकीत सत्तेसाठी आटापिटा सुरू केला तर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार व संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यात एक बहुजन वंचित आघाडी स्थापन करत राज्यातील दलित, मुस्लिम, धनगर, तेली, माळी, कुणबी, आदिवासी, कोळी सह वंचित घटकातील समाज एकत्र केला व याला मुस्लिम समाजनेते एमएमआयचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी साथ देत राज्यात घेतलेल्या संयुक्त सभा वंचित आघाडीच्या गाजल्या राष्ट्रीय राजकारणात वेगळे स्थान असलेल्या ओवेसी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देऊन महाराष्ट्रातील प्रस्थापित पुढाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे केले असून. भीमकोरेगाव च्या दंगली नंतर ऍड प्रकाश आंबेडकर यांची समाजात क्रेज वाढलेली दिसत आहे.

राष्ट्रीय पक्ष म्हणुन ओळख असलेल्या (मायावती यांच्या BSP) बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत खाते सुद्धा उघडता आले नाही, तेव्हा २०१९ च्या निवडणुकी मध्ये बी एस पी चा हक्काचा मतदार वंचित बहुजन आघाडी ला छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी च्या सभांना लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद हा मतांच्या आकडेवारीत बदलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण आंबेडकर यांच्या सभांना लोक स्वखर्चाने वाहन करून कुठलीही अपेक्षा न ठेवता जमत होते. ही प्रकाश आंबेडकर यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी चा प्रस्ताव अमान्य करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण गत लोकसभा निवडणुकीत फक्त 2 जागेवर काँग्रेस ने विजय मिळवला होता तर मातब्बर नेत्यांना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा काँग्रेस चा परंपरा गत दलित मतदार हा ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे नव्या आशेने पाहत असून असददुद्दीन ओवेसी च्या माध्यमातून काँग्रेस ची मुस्लिम मते वंचित आघाडी कडे आकर्षित होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडी आपले स्थान भक्कम करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीला मत विभाजनाची चिंता!

आताच्या निवडणूक मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांची युती असून कोणताही मजबूत दलित पक्ष काँग्रेस पक्षा सोबत नाही त्यामुळे दलित व वंचित मते काँग्रेसचेच्या पारड्यात पडणार नाही अशी भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे दलित मतांचे विभाजण होणार असल्याची चिंता काँग्रेस पक्षाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसला मत विभाजनाची चिंता सतावत आहे. कारण आता बहुजन वंचित आघाडीची क्रेज दिवसेंदिवस वाढत असल्याने भारिप नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने दलित व वंचित समाजाला खंबीर नेतृत्व मिळाले आहे. मात्र असे झाले तर काँग्रेस व राष्ट्रवादी चे पाणीपत होणार हे निश्चित!

 

Check Also

विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार

 केंद्रातील मोदी सरकारचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा डाव आहे, त्यांनी संविधानाला हात लावण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *