Tuesday , June 18 2019
Breaking News Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’       Breaking News - अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला       Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर      
Home / ब्रेकिंग न्यूज / धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या

धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या २४ एप्रिल २०१५ च्या एका पत्रानुसार सन २०११ ते २०१४ या कालावधीत ६ हजार २६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. मात्र, जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ११ हजार ९९५ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे या पीडित कुटुंबीयांपैकी ४३ टक्के शेतकरी कुटुबीयांना कुठलाही मोबदला किंवा सरकारची मदत मिळाली नसल्याचंही समोर आलं आहे. 

घाडगे यांनी मुख्यत्वे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यात ४ हजार ३८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एकूण ४ हजार १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपला जीव गमावला आहे. 

दरम्यान, शेतकरी आत्महत्येनंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येतो. त्यानुसार सरकारी दफ्तरी या आत्महत्येची नोंद ठेवण्यात येत असते.

Check Also

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *