Monday , May 20 2019
Breaking News Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर       Breaking News - मनसेच्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून धनंजय मुंडेंनी रद्द केली सभा       Breaking News - विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार       Breaking News - पुण्यातून लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा नकार       Breaking News - अजितदादांची डोकेदुखी वाढली; मावळ, शिरूरमध्ये प्रचार न करण्याचा काँग्रेसचा निर्धार       Breaking News - राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला       Breaking News - धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या       Breaking News - अबकी बार, सोलापूर का खासदार…आंबेडकर का वारीसदार !       Breaking News - युतीच्या मनोमीलन बैठकीकडे भाजप आमदार, नगरसेवकांची पाठ      
Home / पुणे परिसर / राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला

राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला

पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत आणि कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर सात जण फरार आहेत. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या नातेवाईकांच्या हॉटेलवर घडला. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी सौदाई याचा काल वाढदिवस होता त्यामुळे हॉटेल सलोनी येथे सनीसह त्याचा भाऊ सचिन सौदाई, सुनील शर्मा, अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू आणि इतर सात जण आले होते. हे हॉटेलमध्ये उधारीवर दारु मागत होते. यासंबंधी हॉटेल मालक आणि नातेवाईक राकेश यांनी नगरसेवक डब्बू आसवानी यांना फोन करून माहिती दिली. ते तातडीने हॉटेलवर मुलासह पोहचले, तेव्हा डब्बू आसवानी यांनी अगोदर पैसे द्या आणि वस्तू घ्या असे म्हटले. मात्र, सनीसोबत असलेल्या अजय टाकने सनी भाईचा वाढदिवस असल्याने पैसे देणार नाही असे उत्तर दिले.

दरम्यान, आसवानी यांचा मुलगा अमित यालाही त्यांनी शिवीगाळ केली. त्यावर भाषा नीट वापरा, असे अमितने म्हणताच त्याच्या डोक्यात आरोपीने पाण्याच्या जगने प्रहार केला. मुलाला मारताच नगरसेवक यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आसवानी आणि अमितला आरोपीने दारुच्या बाटल्या फेकून मारल्या. त्याचवेळी सचिन सौदाईसह ४ ते ५ जणांनी हॉटेलच्या बाहेर लोखंडी कोयता आणि लाकडी दांडके घेऊन उभे होते. त्यामधील एकाने तुझी विकेट टाकतो म्हणत आसवानींच्या डोक्याला पिस्तूल लावले.

त्यानंतर त्यांच्यात झटापट झाली आणि पिस्तूल आसवानी यांच्या मागील बाजूस लागले. तेवढ्यात एकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसवानींनी आरडाओरडा केल्याने सर्व आरोपी पळून गेले. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. इतर सात जणांचा शोध पोलीस घेत आहे.

Check Also

विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार

 केंद्रातील मोदी सरकारचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा डाव आहे, त्यांनी संविधानाला हात लावण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *