Friday , July 19 2019
Breaking News Breaking News - बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी अध्यादेश काढावा- डॉ. अमोल कोल्हे        Breaking News - खासदार अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, बैलगाडा शर्यतींचा प्रश्न संसदेत मांडला       Breaking News - अजित पवारांच्या फटकेबाजीला एकनाथ खडसेंची दाद       Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’      
Home / ब्रेकिंग न्यूज / विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार

विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार

 केंद्रातील मोदी सरकारचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा डाव आहे, त्यांनी संविधानाला हात लावण्याचे काम करू नये. मोदींनी विस्तवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा , जनता हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदींचा देशात देशात हुकूमशाही आणण्याचा डाव आहे, निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे, काळा पैसा, गंगा स्वच्छता, राम मंदिर आणि सर्वच गोष्टींवर खोटी आश्वासने  देण्याशिवाय या सरकारने काही केलेले नाही, असा घणाघात पवार यांनी केला आहे. डोक्यात सत्तेची मस्ती गेल्याने माज आलेल्या सरकारला धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, भाजप सरकाच्या काळामध्ये 11 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हजारो शेतकर्‍यांची कुटुंबे उघड्यावर आली असताना सरकार मदत करत नाही. उलट भाजपचे नेते शेतकर्‍यांबद्दल अपशब्द बोलत असल्याची टीका पवारांनी केली आहे.

Check Also

मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला

नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला . १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *