Tuesday , June 18 2019
Breaking News Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’       Breaking News - अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला       Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर      
Home / ब्रेकिंग न्यूज / ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर

‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर

‘मी नरेंद्र मोदींचा खूप आदर करतो, पण राजीव गांधींविरोधात बोलण्याची गरज नव्हती’

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका करत आहेत. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख केला असून भ्रष्टाचारी असा आरोप केल्याने वाद निर्माण झाला आहे. एकीकडे काँग्रेस नेते नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देत असताना कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याने आपण नरेंद्र मोदींशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. कर्नाटकमधील भाजपा उमेदवार व्ही के प्रसाद यांनी नरेंद्र मोदींनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

‘राजीव गांधींच्या हत्येचा कट आखण्यात आला होता. भ्रष्टाचारामुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही. कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही. माझाही यावर विश्वास नाही. मी नरेंद्र मोदींचा खूप आदर करतो, पण राजीव गांधींविरोधात बोलण्याची गरज नव्हती’, असं त्यांनी म्हटलं आहे.

व्ही के प्रसाद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होती. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि राज्यमंत्री झाले होते. २०१७ मध्ये ते पुन्हा भाजपात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून शेवट झाला अशी टीका केली होती.

‘नरेंद्र मोदींच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मी राजीव गांधींना अत्यंत जवळून ओळखत होतो. देशातील कोणीही मोदींच्या आरोपांशी सहमत होणार नाही. त्यांनी ते वक्तव्य करायला नको होतं’, असं व्ही के प्रसाद यांनी म्हटलं आहे. राजीव गांधी यांना मिस्टर क्लीन म्हणून ओळखलं जायचं असंही ते म्हणाले आहेत. ‘तरुण वयात त्यांच्यावर पंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी पडली होता. त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली’, असं व्ही के प्रसाद यांनी सांगितलं.

Check Also

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *