Tuesday , June 18 2019
Breaking News Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’       Breaking News - अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला       Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर      
Home / पिंपरी चिंचवड / S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर

S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर

राजन पाटील यांनी प्रकल्पास २५ तारखेपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले असता S.R.A प्रकल्प  व पंतप्रधान आवास योजना या प्रकल्पास स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? असा संतप्त सवाल आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केला.

पिंपरी चिंचवड – महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उद्यमनगर  येथे S.R.A प्रकल्प  व पंतप्रधान आवास योजना  झाला असून त्या प्रकल्पास उद्यमनगर येथील उच्चभ्रु सोसायटीतील लोकांनी विरोध केला आहे .तसेच त्याचे म्हणणे  असे आहे कि ,यशवंतनगर झोपडपट्टीतील लोकांचे पूनर्वसन उद्यमनगर या ठिकाणी न करता इतरत्र करावे.असे निवेदन उद्यमनगर कृती समितिनी सह शहर अभियंता राजन पाटील यांना दिले होते.त्यांनी प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याने यशवंत नगर येथील रहिवासीयांनी शहरातील विविध संघटनांना घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढला त्यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन S.R.A प्रकल्प  व पंतप्रधान आवास योजना उद्यमनगर या ठिकाणीच व्हावा.असे निवेदन दिले त्यावेळी रहिवाश्यांनी राजन पाटील यांनी प्रकल्पास २५ तारखेपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले असता S.R.A प्रकल्प  व पंतप्रधान आवास योजना या प्रकल्पास स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? असा संतप्त सवाल आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केला.

 उच्चभ्रु सोसायटीतील लोकांना गाडीचे ड्रायव्हर ,घरकाम करण्यासाठी महिला ,सोसायटीचे रक्षक,झोपडपट्टीतील चालतात ? तर तेच लोक आपल्या परिसरात राहण्यास त्यांचा विरोध का ? असा सवाल यशवंतनगर येथील राहिवासियांनी केला. स्वतः या प्रकरणाची चौकशी करून आपणास न्याय मिळून देईन असे आश्वासन आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी दिले.

यावेळी शहरातील विविध संघटनाचे पधाधिकारी प्रवीण कांबळे ,फारुख कुरेशी,शिवशंकर उबाळे,अल्ताफ शेख,अविनाश चौधरी,गुलाब पानपाटील,शिवाजी सदाफुले व तसेच यशवंतनगर मधील रहिवासी उपस्थित होते.

Check Also

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *